तळेगाव येथे 14 व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा या सबंधी कार्यशाळा।

0

सरपंच संघटनेच्या सचिवांनी केले मार्गदर्शन

जामनेर( प्रतिनिधी) आमचे गाव विकास आमचा विकास या अभियानांतर्गत शहापूर गणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सरपंच संघटनेचे सचिव युवराज पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आपण सरपंच जरी पाच वर्षासाठी राहत असलो  ,तरी गावात आपण कायमस्वरूपी राहत असतो. म्हणून आपल्या गावाचा शास्वत विकास व गावाच्या मूलभूत गरजा या लक्षात घेऊन सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्यासाठी व  वेळ प्रसंगी आपला इगो बाजूला ठेवून सरपंचांनी ग्रामसेवकांना मदत करून कृती आराखडा तयार करावा .असे आवाहन केले.

यावेळी विस्ताराधिकारी डी एस लोखंडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की 14 वित्त आयोगा चे नियोजन ग्रामपंचायतींना करायचेअसून एक वर्षांचा आराखडा दीडपट आधी बनवायचा आहे. व त्यापुढील पाच वर्षांचा आराखडा हा दुप्पट रकमेचा बनवायचा आहे.

साधारणतः लोकसंख्येनुसार हा 14 वा वित्त आयोगाचा निधी आता उपलब्ध होणार असून दरडोई म्हणजे माणसी 408 रुपये वार्षिक असा असेल ,आणि याचं नियोजन करताना ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या तिप्पट समिती तयार करून मग त्यात ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, ग्राम संसाधन सदस्य ,महिला बचत गट अध्यक्ष ,सचिव, कोषाध्यक्ष सीआरपी आरोग्य सेवक , अंगणवाडीसेविका ,तलाठी कृषी सहाय्यक ,पोलीस पाटील सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य ,सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचारी, राज्य शासन व केंद्र शासनाचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश करावा. तसेच बाल सभा, महिला सभा यांच्यातून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करता येईल .याबाबत नियोजन करावे. तसेच 18 शासकीय विभागाच्या समस्या जाणून घेऊन .त्यात त्यांना कुठे स्थान देता येईल ते पहावे .जेणेकरून गावात शाश्वत विकास होऊन गावकऱ्यांचे जीवनमान उंचावेल ,असा हा कृती आराखडा तयार करावा .व शासनाचा हा कार्यक्रम यशस्वी करावा. असे आवाहन केले .यावेळी पर्यवेक्षिका म्हणून केंद्रप्रमुख अलका वानखेडे व मधुकर बहारे आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक संघटनेचे सचिव युवराज पाटील ,जळांद्री सरपंच चांगदेव पाटील, शेळगाव सरपंच निवृत्ती पाटील ,शांताराम जाधव तसेच गणातील सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडीसेविका ,आरोग्य कर्मचारी ,मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.