शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित न करणेबाबत शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा।

0

पारोळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन रोहित्र कट करण्याची जी मोहीम हाती घेतली आहे ती मोहीम बंद करून शेतकऱ्यांकडील सक्तीने वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी पारोळा तालुक्यात मागील तीन वर्ष कोरडा दुष्काळ ओला दुष्काळाने पूर्णपणे निपचित झालेला आहे व यावर्षी रब्बी पिकपेरा शेतकऱ्यांनी केलेला आहे आता तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आहे व तो घास हिरावून घेण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे.

कोरोना सदृश्य काळात सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांची झालेले आहे माल काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांचा माल स्वस्त भावाने दिला गेला त्यावेळी शेतकऱ्यांनी संपूर्ण देशाला सहकार्य केले परंतु आज त्याच शेतकऱ्यांवर विज बिल वसुलीसाठी सामूहिक वसुलीचे तंत्र वापरून त्यात शेतकऱ्यांचे विद्युत ट्रांसफार्मर कनेक्शन कट करून शेतकर्‍यांना हवालदिल केले जात आहे आलेले पिके करपून जळून जातील व या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक वाढू शकतात वीज तोडणी मोहीम पूर्णपणे बेकायदेशीर असून व अन्यायकारक आहे आतासुद्धा वीज वितरण कंपनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करीत आहे ३ एच पी कनेक्शन ला ५ एचपी पंपाची बिल व ५ एचपी पंपाची बिल ७ एचपी चे  बिल देण्यात येत

आहेत वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम ही शेतकऱ्यांवर दरोडा आहे।

वीज तोडणी मोहीम थांबवावी अन्यथा शेतकरी संघटना उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी इलेक्ट्रिकल बोर्ड व महावितरण कंपनी वर राहील असे आशयाचे निवेदन मा अभियंता वीज वितरण कंपनी पारोळा व मा तहसीलदार सो पारोळा व मा आमदार चिमणराव जी पाटील व पोलीस निरीक्षक सो पारोळा यांना निवेदने देण्यात आली।

यावेळी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक डॉ पृथ्वीराज पाटील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील कार्याध्यक्ष भिकनराव पाटील युवा अध्यक्ष ग्रामीण सुनील देवरे युवा अध्यक्ष शहर निलेश चौधरी कायदेशीर सल्लागार ऍड भूषण माने छावाचे विजू दादा पाटील प्रतापराव पाटील पंढरीनाथ पवार सुनिल पवार ज्ञानेश्वर पाटील निलेश चौधरी जितेंद्र महाजन सचिन पाटील राम कृष्ण मराठे आधार पाटील नामदेव पाटील सुनील पाटील संदीप पाटील नितीन पाटील इ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.