शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर व आ.चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत 19 रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

0

भुसावळ (प्रतिनिधी) –   रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर व आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले राज्यस्तरीय शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी  शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी  2019 रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेच्या दरम्यान तातडीच्या  बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे .  सदर बैठकीत भुसावळ ,जामनेर ,चोपडा ,रावेर ,  मुक्ताईनगर येथील स्वतंत्रपणे विधानसभा क्षेत्रनिहाय नुसार  आयोजित केलेली आहे.

या बैठकीला रावेर लोकसभा मतदार संघातील मुख्य पदाधिकारी ,उपजिल्हा प्रमुख ,  शहर प्रमुख ,तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख , विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका संघटक ,या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावयाचे आहे . सर्वांची उपस्थिती या बैठकीला अनिवार्य आहे अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची लेखी नोंद घेतली जाईल तरी रावेर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या भुसावळ ,जामनेर ,चोपडा ,रावेर ,  मुक्ताईनगर या विधानसभा मतदार संघातील निवडक पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह पद्मालय जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर व आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.