शेंदुर्णीत विजांच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे सोन नदीला महापुर

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोमवारी मध्यरात्री व मंगळवारच्या पहाटे विजांचा भयानक कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सोन नदीस प्रचंड पुर आला आहे. नदी काठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ निर्माण झाले असुन यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाःकार माजला आहे. शेंदुर्णीमध्ये बऱ्याच वर्षानंतर सोन नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर आल्याने नदिकाठच्या असंख्य घरात पाणी गेले असते पण संरक्षक भिंतीमुळे धोका टळला. आठवडे बाजार, वीस देवळी, शनि मंदिर या ठिकाणी तसेच बसस्थानक परिसरातील नदी, नाले भरभरून वाहत होते.

नागरिकांना केले सतर्क..

मध्यरात्रीच्या मुसळधार पावसाने जोर धरलेला असतानाच वीजपुरवठा खंडित झाला. नदीला महाकाय पुर आल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पं. दिनदयालजी पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी या परिस्थीमध्ये तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, सुचना केल्या मदतीचा हात दिला.

संततधार पावसाने शेतकरी संकटात सापडला असुन कपाशी, मका ,केळी,फळबाग आदींचे अतोनात नुकसान झाले असुन ओल्या दुष्काळामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.