शिवसेनेच्या दणक्याने भुसावळात पथदिवे दुरुस्तीला सुरूवात

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  नगरपालिका प्रशासनाने खाजगी संस्थेला शहरातील सर्वच पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसह अन्य अनुषंगिक कामे दिली आणि या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचे एलईडी पथदिवे लावले. 60 टक्के वीज बचत तसेच नपाचा वाचणारा मनुष्यबळ आणि देखभाल-दुरुस्ती खर्च मिळून वर्षाला सुमारे एक कोटींची बचत होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर कंत्राटदाराने देखभालीकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. इशार्‍याची गांभीर्याने दखल घेत बुधवारपासून जामनेर रोडवरील पथदिवे दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली

बंद पथदिव्यांमुळे होणारी गैरसोय पाहता तातडीने पथदिवे दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी पावले न उचलल्यास जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम गोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुरा चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला दिला होता.शिवसेनेच्या आंदोलनाचा इशारा येताच मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे. शिवसेनेच्या भूमिकेचे नागरीकांनी कौतुक केले. या कामाबरोबरच नगरपालिका प्रशासनाने शहरातील सार्वजनिक स्वच्छता, खड्डे दुरुस्ती, रस्ते पॅचिंग, दूषित पाणीपुरवठा व अन्य नागरी सुविधा सोडविण्यातही लक्ष घालण्याचे आवाहन केले शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.