शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

धरणगाव/जळगाव :- उत्तम शिक्षक ही देशाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक शिक्षकाने शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांची संशोधनाप्रती रुची वाढविणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे. आम्हीही शिक्षकांच्या माध्यमातून घडलो आहे. शिक्षकांच्या व शिक्षक संघटनांच्या अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी  आपले सरकार व मी सदैव प्रयत्नशील राहील. जि.प.शाळांसाठी संरक्षक भिंत, पिण्याचे पाणी व सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी डी,पी.डी.सी. मधे शिक्षण विभागाला भरीव तरतूद करणार  असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी पाळधी ता.धरणगाव येथे धरणगाव तालुक्यातील प्राथ.व माध्य.शिक्षक संघटना व शिक्षण विभाग पं.स. धरणगाव यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.शिक्षण सभापती रविंद्र पाटील, पं.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि.प.सदस्य गोपाळ चौधरी, प्रतापराव पाटील, पं.स.सदस्य प्रेमराज पाटील, अनिल पाटील, आसाराम कौळी, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे पवार, सुनिल झवर, धनराज कासट, दामूअण्णा पाटील, राजूभैय्या पाटील, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, गशिअ अनिल बाविस्कर, शिविअ अशोक बि-हाडे व  तालुक्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजयी विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच सोनवद खुर्द येथील कु.सृष्टी लाखे या विद्यार्थिनीने स्वच्छता अभियान बाबतीत केलेल्या मनोगताने मा.मंत्री महोदय व उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल बाविस्कर यांनी, सुत्र संचलन शरद पाटील यानी तर आभार प्रदर्शन अशोक बि-हाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमोद सोनवणे, अरूण अत्तरदे, नाना पाटील, प्रभात तडवी, शरद पवार, प्रकाश बडगुजर, रमेश बोरसे आदिनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजयी विद्यार्थी

वकृत्व स्पर्धा लहान गट (इ४थी ५वी)- प्रथम- कु चेतना बोरसे-वंजारी,

द्वितीय- नेहा अडकमोल- पाळधी कन्या, तृतीय- तेजस्विनी पाटील- अनोरे

मोठा गट(इ६त८)- प्रथम- भाग्यश्री मोरे- धरणगाव,

द्वितीय- वैष्णवी गोसावी- जांभोरे, तृतीय- भूमिका पाटील- निंभोरे

निबंध स्पर्धा

लहान गट (इ४थी५वी)

प्रथम- भाग्यश्री पाटील- बांभोरी बु, द्वितीय- कल्याणी पाटील- एक लग्न,तृतीय- कल्याणी रामकृष्ण पाटील- निंभोरा

मोठा गट(इन६ते८) – प्रथम- वैष्णवी पाटील- वराड

द्वितीय- दीपिका पाटील- बांभोरी , तृतीय- अमीन पटेल- पाळधी बॉईज

Leave A Reply

Your email address will not be published.