शासकीय हरभरा खरेदी सुरू; 5100 प्रति क्विंटल हमी भाव

0

बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5100 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. ह

रभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संग्रामपुर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्याकरीता हेक्टरी उत्पादकता 15.82 क्विटल देण्यात आली आहे.  तरी शेतकऱ्यांनी हमीभावाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी उपरोक्त संस्थांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.