शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शहनाज खाटीक तर उपाध्यक्ष पदी योगेश पाटील यांची निवड

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील शिरूड येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शहनाज खाटीक यांची तर उपाध्यक्ष योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील शिरूड येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीची निवड करण्यासाठी सोमवार (दि.१३) रोजी  माजी अध्यक्ष नंदू कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा घेण्यात आला.

यावेळी समितीमध्ये प्रत्येक वर्गाचे दोन  प्रतिनिधी असे  पालकांची निवड करण्यात आली. यात जितेंद्र पाटील,प्रियंका पाटील, प्रा.सुभाष पाटील, कविता पाटील, मनीषा कोळी,वासुदेव पाटील, हेमंत पाटील, रामदास वैराळे,विजया भिल,शहनाज खाटीक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक रत्ना भदाणे, शिक्षक छोटूलाल सूर्यवंशी, अशोक पाटील,चंद्रकांत पाटील, विनोद पाटील, दर्शना चौधरी संगीता पाटील तर गावातील सरपंच गोविंदा सोनवणे तसेच इतर  ग्रा.पं सदस्य, पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी पं.स. सभापती श्‍याम अहिरे गावातील  सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पालक उपस्थित होते. या निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.