शहराला लागलेले ग्रहण दूर करण्याची धमक फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्येच – जगन सोनवणे

0

आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक
भुसावळ (प्रतिनिधी)- विद्यमान आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांचे कार्यकर्ते भुसावळ शहरात प्रसार माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून भुसावळ करांची फसवणूक करीत असल्याचा आरोप पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केले. येथील भीमालयात सोमवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी जगन सोनवणे पुढे म्‍हणाले कि, शहरात होत असलेला दुषित पाणीपुरवठा,रस्त्याचे झालेली दुरावस्था आदी बाबत पत्रकार परिषदा घेऊन शहराचे वातावरण दूषित केले जात असून नुसते कागदी घोडे नाचवणे हेच काम आजी-माजी आमदाराचे कंपू करीत असल्याचेही सोनवणे म्हणाले. भुसावळ शहरातील रस्त्यांचा गंभीर प्रश्न आहे. रस्ते हे आमच्या रक्त वाहिन्या आहेत.चार वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी दूषित पाणीपुरवठा,रस्त्यांचे प्रश्न सोडवले नाही.भुसावळकर जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्‍योग सत्ताधारी करीत आहे. जनतेला कर भरून सुद्धा न्याय मिळत नाही. आजी-माजी आमदारांचे वाद कधीच संपणार नाही. मग जनतेचे काय? असा प्रश्न देखील जगन सोनवणे यांनी उपस्थित केला. जनतेला विकासाची कामे पाहिजेत आम्ही पीआरपी व विविध १० संघटनांच्या वतीने मागच्या वर्षी रस्त्यावर कमळाबाईचे पूजन केले होते.आता पुन्हा रस्त्यावर झोपून अर्ध नग्न मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. भुसावळ शहरातील माजी नगराध्यक्ष स्व. देवीप्रसाद शर्मा यांनी शहराच्या विकासाचा पाया रचला आहे.संतोष चौधरी यांनी त्याचा श्रेय घेतला आहे. मी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी जाहीर सभेत संतोष चौधरी यांना शिल्पकार म्हटले होते. मात्र खरी विकासाची गंगा देवीप्रसाद शर्मा यांनी भुसावळमध्ये आणली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या कार्यकाळात जे रस्ते तयार झाले ते निकृष्ट दर्जाचे आहेत.ते तीन वेळा भुसावळ तालुक्याचे आमदार असल्यावर देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची विकासकामे केली नाहीत किंवा दूषित पाणीपुरवठा व स्वच्छता रस्ते याचे काम झाले नाही.शहर खड्डेमय झाले आहे. भुसावळ शहर हे दुर्गंधीचे शहर म्हणून आमदार सावकारे यांच्या मुळे ओळखले जात आहे असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बदनाम होत आहे.

भुसावळ शहराला लागलेले ग्रहण दूर करण्याची धमक फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्ये आहे.भविष्यात आम्ही मोठे आंदोलन करणार असल्याचेही सोनवणे यांनी म्हटले आहे नगरपालिका सत्ताधाऱ्यांनी आम्हाला नागरिक शास्त्र किंवा भूगोल शिकवू नये. भुसावळकरांना विकासाची गरज आहे.भविष्यात आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही शहरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे करू असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या तथा नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे,राकेश बगन,हरीश सुरवाडे,संतोष मेश्राम,मौलाना अब्दुल अजीम मकरानी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.