शहरात मास्क, सॅनिटायझरचा पडला विसर; नियमांची होतेय पायमल्ली…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात संभाव्य तिसरी लाट धूसर होत चाललीय. दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट पाहता कोरोनाच्या संसर्गाविषयी असलेली नागरिकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसत आहे.

परिणामी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी आणि बेजबाबदार पणा वाढत असून सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर विक्रेत्यांकडे मास्कची टंचाई भासत होती. आता मागणी एक टक्क्याच्या आत आल्याचे विक्रेते सांगतात.

कोरोनाच्या तिसरा लाटेची शक्यता धूसर होत असल्याने काही ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणत वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने भीती कमी झाली आहे. पर्यायी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मास्क, सॅनिटायझर  वापर आता कमी झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह खाजगी व शासकीय कार्यालयामध्ये नियमांबाबत पाट्या केवळ नावापुरत्या उरल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.