शरद पवारांना जाणता राजा म्हटलेले कसे चालते? ; मुनगंटीवार यांची टीका

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला टीकेला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, या टीकेला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका मांडली. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही.  “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत, असा आरोप मुनगुंटीवार यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.