व्हर्च्युअल पेंशन अदालतीत ४३ प्रकरणे निकाली

0

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील कार्मिक विभागातर्फे सेवानिवृत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या पेंशन संदर्भातील समस्‍या सोडविण्‍यासाठी व्हर्च्युअल पेंशन अदालत १ याचे आयोजन करण्‍यात आले होते.

या पेंशन अदालतीत आलेले सर्व ४३ प्रकरणे निकाली काढण्‍यात आली व त्यावर चर्चा करून त्‍यांना ४ लाख २७ हजार ९३५ रू.देय रक्कम एनईएफटी व्‍दारे सेवानिवृत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या खात्‍यात तात्‍काळ वर्ग करण्‍यात आले.

विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेककुमार गुप्‍ता, वरिष्‍ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी व्हर्च्युअल पेंशन अदालतीला संबोधित केले. कोव्हीड १९ कोरोनाच्‍या पाश्वभुमीवर आयोजित केलेल्‍या व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे सेवानिवृत कर्मचारी व त्‍यांच्‍या संघटनेने यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या बद्‍दल कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.