शिरूड आरोग्य उपकेंद्राच्या अनिता पाटील यांची उत्कृष्ट कामगिरी

0

अधिकार्यानी केले कौतुक व गावकऱ्यांनी मानले आभार

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला असता आता त्या कोरोनाचे पाऊल ग्रामीण भागात म्हणजे तालुक्यातील शिरूड गावाकडे वळले आहे. यातच शिरूड परिसरात कोरोनाचा 1 रुग्ण आढल्याने 6 जणांना ग्रामीण रूग्णालयात व 58 जणांना शिरूडलाच होम कॉरोटाईन केले आहे. शिरूड आरोग्य उपकेंद्रत सेवा देणारे आरोग्य सेविका अनिता पाटील यांना वरिष्ठांकडून सोपविलेली कामगिरी उत्कृष्ठ प्रकारे बजावित आहेत. यात त्यांनी गावतील होम कॉरोटाईन केलेल्या नागरिकांना सूचना व वेळो वेळी पुरवल्या जाणाऱ्या सेवा दिवस रात्र न पाहता प्रामाणिकपणे करीत आहे. सोबतीला आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत शिपाई, गावातील तरुण यांना सोबत घेऊन गावासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे आपली भूमीका बजावीत आहेत. त्यांच्या या कार्याला पाहून आरोग्य सेविका अनिता पाटील यांचे प्रांत अधिकारी सीमा अहिरे व नागरिकांनी कौतुक केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डी एस पातोडे, तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी, वैद्यकीय अधिकारी एस पी रनाळकर, आरोग्य सहायक बी बी चौधरी, आरोग्य सेवक योगेश गावित, सरपंच सुपडू पाटील, ग्रामसेवक गुलाब सुर्यवंशी, पोलीस पाटील विश्वास महाजन, मा. सभापती शाम अहिरे, प्रा. सुभाष पाटील, इंजि प्रफुल्ल पाटील, पत्रकार शरद कुलकर्णी, अमोल पाटील, रजनीकांत पाटील, शशिकांत पाटील, आनंदा पाटील,बाळकृष्ण पाटिल, ग्रा,पं शिपाई सतीश पाटिल ,शंकर कढरे पा.पु कर्मचारी योगेश पाटील गावातील तरुण हरीश पाटील अंकित पाटील आदिंची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.