व्यावसायिकावर प्राणघात हल्ला

0

जळगाव :- शहरातील कोर्टचौकातील एका खाजगी कार्यालयात तिघांनी व्यावसायिकाच्या कार्यालयात प्रवेश करून त्याच्यावर प्राणघात हल्ला केल्याने व्यावसायिकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. हि घटना २५ रोजी राजी ८.३० वाजाच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक असे की, राहुल छाजेड यांचे कोर्ट चौकातील लक्ष्मन निवास या बिल्डींगमध्ये बांधकाम व्यवसायाचे ऑफिस आहे. ते सायंकाळी ऑफिसमध्ये बसलेले असतांना तीन युवकांनी ऑफिसमध्ये प्रवेश केला व नाशिकच्या पार्टीचे पैसे देवून टाक? ते पैसे वसुलीची सुपारी आम्ही घेतली. भंडारी भाऊचे पैसे देवून टाका, जळगाव मध्ये धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणून तिघांनी राहुल याला बेदम मारहाण केली. तिघांनी राहुल यांचे डोके कार्यालयाच्या काचेच्या शोकेसावर आपटल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या मारहाणीचा प्रकार ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून तिघेही तरुण जळगाव शहरातील आहे. जखमी राहुल यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबतचा पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.