खडसेंच्या वक्तव्याने शिवसेनेत संतापाची लाट

0

भुसावळ :- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमिषे दाखवून त्यांचा का पक्षात प्रवेश करून घेत आहेत असा खडा सवाल शिवसेनेत उपस्थित झाला असुन शिवसेनेत संतापाची भावना निर्माण झालेली आहे. कारण खडसे यांचे शिवसेना संपविण्याचे षड्यंत्र रात्रदिवस सुरूच आहे व शिवसेना सोबत असल्याचा दावा करणे हे दिशाभूल करण्याचा प्रकार असून एकीकडे कोणताही युतीधर्म खडसे पाळत नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर भेट घेऊन अधिकृतरित्या जाहीर करीत नाही तोपर्यंत युतीच्या माध्यमातून खडसे परिवाराचे काम एकही शिवसैनिक करणार नाही असा फतवा रावेर मतदार संघातिल शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकानी पत्रकान्वये काढला आहे.

शिवसेना रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, राज्यात शिवसेना भाजपची युती झाली आहे. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेना संपविण्यासाठी चालवलेल्या कारवाया व 2014 च्या वेळेस मोठ्या गर्वाने युती तोडण्याची घोषणा केली होती. यामुळे खडसे हे शिवसेनेसाठी खलनायक असून जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात त्यांच्या बद्दल शिवसैनिकात प्रचंड चीड असून दिनांक 21 मार्च रोजी मुक्ताईनगर येथे रावेर लोकसभा मतदार संघातील उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख असे प्रमुख पदाधिकारी यांनी यांनी जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून खडसे परिवाराचे काम न करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. म्हणजेच सेनेमध्ये उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख हे जो निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य असतो तसेच सेनेमध्ये संघटन संघटनात्मक रचना आहे. त्या अनुषंगाने उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेत कार्य होत असतं हे खडसे परिवाराला माहित नाही. कारण ते पक्षाला जुमानत नाहीत हे आजपर्यंतच्या त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आलेले आहे. कारण ते स्वतःला पक्षा पेक्षा मोठे समजतात हीच त्यांची खरी अडचण आहे यावेळी आंदोलनादरम्यान जिल्हाप्रमुख यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांचा गेल्या पाच वर्षात छळ करून खडसेंनी शिवसैनिक यांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे याबाबत पक्षप्रमुखांची भेट घेऊन शिवसैनिकांच्या भावना त्यांना कळवेल असे आश्वासन दिल्यावर पदाधिकारी व शिवसैनिकांनी दोन तास चाललेल्या ठिय्या आंदोलन आटपते घेतले.

मात्र, खडसे परिवाराच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्धार शिवसैनिकात दिसून आला मात्र रविवारी उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांनी एक-दोन कार्यकर्ते वगळता शिवसेना माझ्या सोबत असल्याचा कांगावा केला आहे. मुळात जर सेना सोबत असेल तर मग तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमिषे दाखवून त्यांचा का पक्षात प्रवेश करून घेत आहेत, असा खडा सवाल शिवसेनेत उपस्थित झाला असुन शिवसेनेत संतापाची भावना निर्माण झालेली आहे, कारण खडसे यांचे शिवसेना संपविण्याचे षड्यंत्र रात्रदिवस सुरूच आहे व शिवसेना सोबत असल्याचा दावा करणे हे दिशाभूल करण्याचा प्रकार असून एकीकडे कोणताही युतीधर्म खडसे पाळत नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर भेट घेऊन अधिकृतरित्या जाहीर करीत नाही तोपर्यंत युतीच्या माध्यमातून खडसे परिवाराचे काम एकही शिवसैनिक करणार नाही, असा सेनेचा पवित्रा आहे.

पत्रकावर
छोटू भोई (तालुकाप्रमुख मुक्ताईनगर),
अफसर खान (अल्पसंख्यांना जिल्हा संघटन), सुनील पाटील (विधानसभा क्षेत्रप्रमुख मुक्ताईनगर)
गोपाळ सोनवणे ( माजी उपजिल्हाप्रमुख),
राजेंद्र हिवराळे (शहर प्रमुख),
गणेश टोंगे (शहर प्रमुख),
वसंत भलभले (शहर संघटक)
यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.