वैजापूर येथील चीमुकालींच्या न्यायासाठी जनआक्रोश मोर्चा

0

चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन मूलीवर दि १४ रोजी रात्री आठ वाजता देवेंद्र भोई याने बलात्कार केला होता. या घटनेतील पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता चोपडा येथील शासकीय विश्राम ग्रह पासून ते थेट तहसिल कार्यलय पर्यत भव्य अश्या जनाआक्रोश मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात तालुक्यातील आदिवासी बांधवांची सर्वात मोठी उपस्थिती दिसून आली असली तरी या मोर्चात चोपडा शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्वतःहून शहभागी झाले होते.त्यामुळे या मोर्चात किमान पाच हजार लोक विविध घोषणा बाजी करून आरोपीला तात्काळ फाशी देण्याचा मागणीसह अन्य घोषणा देऊन दुपारी दीड वाजता तहसीलदार अनिल गावीत यांना तश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.

मोर्च्यात यांनी घेतला सहभाग
या सर्व पक्षीय मोर्चात विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार जगदीश वळवी, मनसेचे नेते अनिल वानखेडे, नगरसेवक महेंद्र धनगर, धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, माजी प स सदस्य डॉ चंद्रकांत बारेला,प स सभापती आत्मराम म्हाळके, सजीव बाविस्कर, प्रा प्रदीप पाटील, प्रा शरद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, महेंद्र भोई, सत्रासेन येथील ज्ञानेश्वर भादले, गोपाळ सोनवणे, संजीव सोनवणे, रवी मराठे, राजाराम पाटील, लोकसंघर्ष मोर्च्या चे जळगावहून विनोद देशमुख, सचिन दांडे, रामचंद्र भादले, नगरसेविका सरला शिरसाठ,सुरेखा माळी, अश्विनी गुजराथी, दीपाली चौधरी, ताराचंद पावरा, भूषण भिल, नंदा बारेला, डॉ सोनाली बारेला, अमोल राजपूत, पिंटू पावरा, रइस खान,प्रमोद पाटील, आदी सर्व पक्षिय पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोर्च्यांत हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

तालुक्यातील विविध संघटनाच्या पदाधिकारी मिळून एकूण ४७ संघटनांचे पाठिंबा या मोर्च्यांचा मिळाला आहे.त्यांनी देखील तहसीलदार अनिल गावीत याना दिले असून विशेष म्हणजे जळगाव जिल्हा भोई समाजाने आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागण्याचे निवेदन चोपड्यात दिले आहे.

या मोर्चात आरोपीला तात्काळ फाशी द्या,भारत की नारी कैशी है,फुल नही चिंगारीं है,लढेगे जितेंगे,आमु आखा एक छे, आमच्या भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे,अश्या विविध घोषणांनी मोर्चा दणाणून निघाला होता.

आजच्या या जन आक्रोश मोर्चात ज्या गावातील पीडित मुलीवर पाशवी बलात्कार झालेला आहे त्या वैजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यां मोर्चात आज सहभागी झाले होते.त्या शाळेतील शिक्षकांनी त्याच्या हातात विविध घोषणांचे फलक दिले होते.अतिशय शिस्तबद्ध ह्या मोर्च्यात मुली,महिला मोठ्या संख्येने हजर होते.

या आहेत मोर्च्याच्या मागण्या:–
खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशी व्हावी,एट्रासिटी कलम लावावे,सदर केस चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम याची नियुक्ती करावी,दोन्ही पीडितांना मनोधैर्य योजनेअंतर्गत लाभ मिळावा,पीडितांची शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी,एफआयआर मध्ये जीवे मारण्याचा व अपहरणाचा कलम लावावे,सदर गुन्हा उच्च अधिकाऱ्यांकडे चौकशी साठी सुपूर्त करावा अश्या विविध  मागण्यांचे निवेदन  वैजापूर येथील मोहिनी बारेला,संध्या बारेला, ममिता बारेला या तिन्ही मुलीच्या हस्ते तहसीलदार अनिल गावित याना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.