वेब मिडिया असोसिएशनचे जिल्हा सचिव पदी गणेश शिंदे यांची निवड

0

पाचोरा(प्रतिनिधी) : वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सचिव गणेश पुजारी यांनी नुकतीच कार्यकारणी ची पहिली यादी जाहीर केली. वेब मीडिया असोसिएशनची मुंबई येथे बैठक घेतली व कार्यकारिणी घोषित केली. महाराष्ट्र राज्यात पहिली वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून त्यांच्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील पोर्टलला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत.

यासाठी त्यांनी अगोदर वेब असोसिएशनची झूम मीटिंग द्वारे पत्रकारांशी संपर्क साधला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक मोठे संघटन उभे राहणार आहे. काल त्यांनी नुकतेच कार्यकारणी पहिली यादी जाहीर केली आहे त्यात उत्तर महाराष्ट्र विभागाचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष व समृद्ध महाराष्ट्र ऑनलाइन न्यूज वेब पोर्टलचे संपादक गणेश शिंदे यांची जिल्हा सचिव पदी निवड केली आहे.जळगाव जिल्यात  गणेश शिंदे  यांनी अतिशय कमी कालावधीत पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक केले असून त्यांनी पत्रकारांनसाठी विविध मागण्या व न्याय मिळविण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून शासकीय दरबारात पाठपुरावा केला आहे. तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चोथा स्थभ असून तो समाजाचा महत्वाचा घटक असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून समाजासाठी ते समाजकार्य करीत असतात.

आणि आता सद्या वर्तमानपत्रची जागा  ऑनलाइन न्यूज’ पोर्टलने घेतली असून वेब मीडिया व ऑनलाइन पोर्टलची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम वेब मीडिया करत आहे. त्यासाठी वेब मीडियावर काम करणाऱ्या पत्रकारांना न्याय व विविध मागन्या करण्यासाठी वेब मीडिया असोसिएशन राज्यात पहिली संघटना मुबंई येथे अनिल महाजन यांनी स्थापना केली आहे. जळगाव जिल्यात गणेश शिंदे यांच्या निवडी बदल त्याचे पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांन तर्फे अभिनंदन वर्षाव केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.