बोदवड तालुका नाभिक समाजबांधवाकडून शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती साजरी

0

बोदवड – शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त बोदवड तालुक्यातील नाभिक समाजबांधवाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नाभिक समाजरत्न शुरवीर जिवाजी महाले यांची ३८५ वी जयंती सोशल डिस्टशिंग पाळून साजरी करण्यात आली.

यावेळी जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जिजाऊ वंदना घेण्यात आली.जिवाजी संघटना बोदवड तालुका नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी तालुकाअध्यक्ष विवेक वखरे,सचिव गणेश सोनोने,सोपान महाले यांनी जिवाजी महाले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.संजय वाघ सर,राजेंद्र डापसे,दुकानदार संघटना अध्यक्ष अनिल कळमकर,हरि सुरंशे,योगेश वखरे,रितेश बिडके,प्रीतम बोरणारे,हरीश क्षीरसागर,मंगेश अंभोरे,गजानन पर्वते व अनेक नाभिकबांधव उपस्थित होते.

यावेळी जिवाजी संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.त्यात रितेश बिडके यांची अध्यक्ष,ईश्वर सुरंशे उपाध्यक्ष,सचिवपदी विजय बोरणारे,कार्यकारिणीत किशोर डापसे,शुभम वाशिमकर,गणेश शेळके यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.