विविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहराचे नगराध्यक्ष करण पवार यांचा वाढदिवस विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन करुन  साजरा करण्यात आला.

नगराध्यक्ष करण पवार यांचा ३४ वा वाढदिवस आज शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शहरात बांधुन तैय्यार असलेल्या मुतारी,सौचालय, रस्ते, बगिचे, यांचे लोकार्पण तर काही नविन विकास कामाचे भुमिपुजन करुन शुभारंभ करण्यात आला त्यात प्रामुख्याने कॅमिस्ट तथा पत्रकार भवनाचे भुमिपुजन करण्यात आले.

तसेच या प्रसंगी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी  जोपासत शहराचे नगरसेवक पि,जी,पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रात्र दिवस शहर तथा ग्रामिण भागातील अनेक गरजुना अनेक प्रकारे मद्दत केली त्यामुळे त्यांची विशेष दखल घेत त्यांचा शहरवासिंयाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर यावेळी दिव्यांगाना निधीचे  वाटप ही करण्यात आले, तर अग्निशमक कर्मचार्याना घरकुलांचे वाटप करण्यात आले,  अनेक कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला, तर सकाळी सर्व नगरसेवकाच्या उपस्थितीत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा न,पा,सभागृहात  साजरा करण्यात आला, तर सांयकाळी पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने बाॅम्बे बुट हाॅऊस येथे नगराध्यक्ष करण पवार यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.

या सत्कारा प्रसंगी नगराध्यक्ष करण पवार यांनी सांगितले कि आमचा एकच ध्यास तो म्हणजे शहाराचा विकास शहराच्या विकास साठी राजकारणात चांगल्या व्यक्ती नी यायला पाहिजे म्हणुन त्यांनी सांगितले कि व्यापारी महासंघाच्या वतीने पुढील निवडणुकित एक दोन उमेदवार व्यापारी महासंघाने द्यावे त्यांची निवडुन आणण्याची गॅंरटी मि देतो,तर सकाळी सर्व कार्यक्रम येथिल नगर पालिके च्या सभागृहात पार पडले या प्रसंगी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील, पचोर्याचे आमदार मंगेश चव्हाण,पारोळा उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान,गटनेते बापु महाजन,अॅड,तुषार पाटील,अारोग्य सभापती भैय्या चौधरी,सामाजिक कार्यकर्ते आशिष शिरोळे,गौरव बडगुजर, दिनेश गुजराथी,अरुण वाणी,व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोककुमार लालवाणी,सचिव संजय कासार सदस्य महेश हिंदुजा,रोशन शहा,धर्मेंद्र हिंदुजा,आकाश महाजन, कैलास पाटील, महाविर भंडारी, यांच्या सह शहरातील प्रतिष्ठत नागरिक  पत्रकार,व्यापारी केमिस्ट बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.