बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.इ.शाळा, लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. या योग दिनी  योगगुरु  सोनवणे सर व योग गुरु  मुकुंद बोहरा, गणेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रांगणात योगासने करण्यात आली, प्रसंगी गटशिक्षणाधिकारी पारोळा सौ. कविता सुर्वे मॅडम, बीआरसी. कार्यालयातील कर्मचारी, किरण शिरसाट, सुधीर सरदार सर, नितेश निकम, जितेंद्र वाघ व पंकज पाटील सर उपस्थित होते.

शाळेचे प्राचार्य शोभा सोनी मॅडम, ऍडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी या योग दिनी, विविध योगासने जसे, सूर्यनमस्कार कपालभाती, आलोम विलोम, चक्रासन, वज्रासन, शिरसासन, हास्यासन, इ योगासने प्रात्यक्षित केली. व आपल्या उत्तम आरोग्यासाठी रोज योगासने करण्याचा संकल्प केला.

विशेष म्हणजे शाळा बंद असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांनी  घरीच योगासने करून ऑनलाइन माध्यमांद्वारे योग दिवस साजरा केला.

संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा यांनी उपस्थित सर्व योग  साधकांचे आभार मानले व जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या ,

Leave A Reply

Your email address will not be published.