नवसंजीवनी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

0

यावल (प्रतिनीधी) तालुक्यातिल प्रा. आ. केंद्र सावखेडासीम ता. यावल कार्यक्षेत्रात येणाऱ्या सातपुडा पर्वतातील आणि राज्याच्या सीमेवर असलेले व अतिदुर्गम भाग असलेल्या उपकेंद्र जामन्या येथे मा. अतिरिक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, व आयुष वि. अधिकारी, आणि प्रभारी प्रशासन अधिकारी डॉ. मनोहर बावणे यांनी भेट देऊन मान्सून पूर्व कामांचा आढावा घेतला.

अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांची व गरोदर मातांची विचारपूस केली, आरोग्य सेविकेला उपकेंद्रातच  प्रसूती  व्हायला हवी आशा सूचना दिल्या, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना व इतर प्रकारचे आर्थिक लाभ लवकरात लवकर दिला जाईल याचे नियोजन करण्यास सांगितले. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागात सावखेडासिम प्रा. आ. केंद्राकडून  दिल्या जात असलेल्या आरोग्यसेवा बद्दल समाधान व्यक्त केले.

तसेच ग्रामस्ताना कोरोना लसीकरणा बाबत असलेले गैरसमज दूर करून लसीकरण करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजाण तडवी, शिवप्रताप घारू, समीर तडवी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.