विल्हाळे रस्त्यावर अनोळखी इसमाचा मृत्यु

0
वरणगाव  –  भुसावळ तालुक्यातील विल्हाळे ते किन्ही रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह मंगळवारी सकाळच्या सुमारास अढळून आला
 येथुन जवळच असलेल्या विल्हाळे ते किन्ही रस्त्यावरील जयराम दामु ठोके यांच्या शेताजवळील रस्त्या जवळ  असलेल्या खड्यात एका चाळीस ते पंचेचाळीस वयोगटाच्या पुरुष मृत अवस्थेत अढळून आला आहे या बाबत विल्हाळे येथील पोलीस पाटील संजय तुकाराम पाटील यांच्या खबरीवरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोहे कॉ संदिप बडगे हे करीत असुन सदर  इसम रंगाने सावळा , अंगात निळ्या रंगाचे टि शर्ट , व चॉकलेटी रंगाची बरमुडा  डोक्यावर टकल , सडपातळ बंधा असे वर्णन असुन सदर इसमाची ओळख पटण्याचे अवाहन वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.