विदगाव येथे हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा

0

विदगाव दि.12-
विदगाव-चोपडा रोडवर तापी नदी पुजाजवळ महारुद्र हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे वानराच्या स्मरणार्थ याठिकाणी हनुमान मंदिर बांधण्यात आले आहे. या निमित्ताने दि.10 रोजी गावातून सवाद्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. दि.11 व 12 रोजी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.13 रोजी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात येऊन रात्री 8.30 वाजता ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज (सर) भुसावळ यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.14 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विदगाव वासी ग्रामस्थांनी केले आहे.
वानराच्या स्मरणार्थ बांधले हनुमान मंदिर
विदगाव ता.जळगांव या गावात सन 2017 मध्ये एक वानर गावात आले होते. ते गावातील प्रत्येक घरी जाऊन अन्न घेत असे यापासून कोणालाही काही इजा झाली नाही.कालांतराने या वनराचा ग्रामस्थांना हनुमान रुपात साक्षात्कार झाल्याने ग्रामस्थ त्याची पूजा करू लागले.एके दिवशी अचानक या वनराचा वाहनाखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. ही वार्ता सर्व गावात पसरली व गाव सुन्न झाले वानराप्रती ग्रामस्थांना लळा लागल्याने त्यांनी या वानराची अंत्ययात्रा काढून दहा दिवसांचा दुखवटा ठेवत वानराचा उत्तरकार्याचा कार्यक्रम केला होता. व सर्व गावातील लोकांनी त्या वानरात हनुमान रूप असल्याने गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तापी नदी पुलाजवळ वानराच्या स्मरणार्थ लोकसहभागातून हनुमान मंदिर बांधण्यात आले व हे मंदिर बांधकाम सुरू होताच गावात परत एक वानर आले असून यामुळे गावातील लोकांची वानर रुपी हनुमानवर श्रध्दा वाढली आहे.यामुळे सर्व विदगाव मधील ग्रामस्थांच्या सहकार्याने हनुमान मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.