गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल

0

वृत्त संस्था –

जगातील प्रसिद्ध असे सर्च इंजिन म्हणून नावाजलेली कंपनी गुगलने केवळ 500 रुपयांमध्ये 4G फोन WizPhone WP006 लाँच केला आहे. हा फोन JioPhone ला टक्कर देणार असल्याची चर्चा बाजारात रंगली आहे.

या फोनचा बराचसा भाग JioPhone शी मिळता जुळता आहे. या फोनमध्ये गुगल असिस्टंट पण देण्यात आले आहे. या फोनचा डिस्प्ले हा 2.4 इंचीचा देण्यात आलेला आहे.

या फोनमध्ये 4 GB इंटरनल स्टोरेजसह 512 MB रॅम देण्यात आली आहे. हा फोन KaiOS या सिस्टिमवर चालतो.

काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये? –

– 1800 MAH बॅटरी
– 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
– सेल्फीसाठी VGA कॅमेरा
– सिंगल सिम सपोर्ट
– 2.4 इंच QWVGA डिस्प्ले
–  पिक्सेल रिझोल्यूशन 240*320
– 1.2गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर
– 512 MB रॅम
– माली-400 जीपीयु इंटिग्रेडेट (खास ग्राफिक्ससाठी)
– 4 GB  इंटरनल मेमरी (मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 128 GBपर्यंत वाढवता येणार)
– बेसिक फोटोग्राफीसाठी 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
– फ्रंट पॅनलवर VGA कॅमेरा

Leave A Reply

Your email address will not be published.