विजवितरणच्या हलगर्जीपणामुळे लाईनमन लाईनमनचा मृत्यू.

0

जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील सोनाळा फाट्यानजीक आपले कर्तव्य बजावत असतांना विज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने लाईनमनचा मृत्यु झाल्याची घटना दि. ८ दुपारी  उघडकीस आली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहुर उपकेंद्रात कार्यरत असलेले राजेंद्र प्रकाश पवार वय ४२ रा लक्ष्मीकॉलनी जामनेर  हे ११ के व्ही वीज प्रवाह असलेल्या विद्युत खांबावर तुटलेला जंम्प जोडण्यासाठी विजकंपनीकडुन रितसर परवानगी घेऊन,त्यानुसार विज खंडीत करून खांबावर चढले,आणी काही कळायच्या आत अचानक विजप्रवाह सुरू झाल्याने राजेंद्र पवार यांचा जागीच मृत्यु झाला,विशेष म्हणजे संबंधीत खांबावरील प्रवाह हा अती उच्चदाबाचा असल्याने विजेचा धक्का लागता बरोबर खाली ठिणग्या पडल्या,परीसरात वनविभागाचे जंगल असल्याने झाडे-झुडपे गवताने पेट घेतला,वन विभागाला आगीची माहिती मिळाल्यावर कर्मचारी घटनास्थळी आग विझविण्यासाठी पोहचले , आगीचे कारण शोधण्यासठी वनविभागाचे कर्मचारी तपास करण्यासाठी गेले असता वायरमन खांबावर मरून पडल्याचे दिसले,तेव्हा ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

चौकशीअंतीच प्रेत ताब्यात घेऊ… 

रितसर विजवितरण विभागाकडुन परवानगी घेतली होती, संबंधीत वायरमनचे काम सुरू असतांनाच अचानक विज कशी व कोणी सुरू केली,याला जबाबदार कोण यासर्व गंभीर प्रकाराची चौकशी झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नसल्याची ठाम भुमीका मयताच्या नातेवाईकांनी घेतली,त्यामुळे रात्री उशीरापर्यंत प्रेत उपजिल्हा रूग्णालयातच पडुन होते.

मयत वायरमनच्या सोबत आणखी कोण-कोण होते, याची चौकशी सुरू आहे,विजपुरवठा बंद करण्याचे परमीट त्यांनी घेतले होते,तरीही काम पुर्ण न होताच विजप्रवाह कसा सुरू झाला आदी बाबी चौकशीमधे समोर येऊन दोषींवर कठोरात-कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  विद्याधर सोनवणे-उपकार्यकारी अभियंता पहुर ता जामनेर.

Leave A Reply

Your email address will not be published.