विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिल्यास प्रगती होते – तुषार प्रधान

0

 भुसावळ (प्रतिनिधी)- शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू आहे. शासनाच्या वतीने हळूहळू शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. कोरोनाच्या काळातही इयत्ता ५ वी ते ८ वी च्या वर्गामधे तालुक्यात पुर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. तसेच तालुका आधार नोंदणी व स्वाध्याय उपक्रमात जिल्ह्यात प्रथम स्थानी आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थी  मोठ्यांचे अनुकरण करत असतात.

या काळात योग्य संस्कार व शिस्त लावल्यास त्यांच्या अंगी चांगल्या गुण बाणले जावू शकतात. यासाठी शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांची ओळख करून देत ते गुण वाढीसाठी प्रवृत्त केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना  आवड निर्माण होवून कला गुणांना वाव मिळाल्यास त्यांच्यात प्रगती होत असल्याचे प्रतिपादन भुसावळ तालुका गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी केले.

कंडारी ता.भुसावळ येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत उर्दु माध्यमाच्या शिक्षकांची शिक्षण परिषद झाली. या परिषदेत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील तीन विद्यर्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यौंचा गुणगौरव संमारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उषा चिल्ड्रन सायन्स सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन, नुतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदिप सोनवणे. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सील ऑफ यंग सायंटीस्ट चे संचालक सुनिल वानखेडे, केंद्र प्रमुख अश्पाक शेख, जावेद शेख, साजीद शहा, रिजवान खान, तवाब खान, कबीर खान आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचेे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम मिस्बाह नाज जावेद ( बी झेड उर्दु हायस्कूल, भुसवळ) द्वितीय कशफ शेख युनुस ( जि.प. उर्दु शाळा, कुऱ्हा ) तृत्तीय अकसा शकील शेख ( मौलाना आजाद उर्दु स्कूल ) यांनी यश मिळवल्याने त्यांचा पालक व शिक्षकांसह सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.