वाळू चोरी करणारे डंपर व जेसीबी गावकर्‍यांनी पकडले

0

मुख्य सुत्रधार मोकाट, अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव,दि.22-
तालु्नयातील हिंगोणे सिम येथील गावाजवळच्या नदी पात्रात मंगळवारी भल्या पहाटे तीन वाजता सरपंच ज्ञानेश्वर महाजन व गावकर्‍यांनी मिळून वाळू उपसा करणार्‍या एक जेसिबी ने डपर भरले जात असताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
यावेळी ग्रामस्थ व वाळू माफिया यांची झटापट झाली. त्यात ते पळून गेले. ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला. हे जेसीबी व डंपर चाळीसगावातील एका माजी नगरसेवकाचे होते अशी चर्चा आहे. मुख्य सुत्रधार मोकाट आणि फरार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने चर्चा रंगली आहे.
चाळीसगाव तालु्नयात गिरणा आणि तितूर नदीपात्रातून वाळू चोरी करणारे माफिया कुठल्या थराला पोहचले आहे याचा वारंवार प्रत्यय येत आहे. या दोन्ही नद्यांमधून राजरोसपणे वाळू माफियांनी थैमान घातले असतना देखील त्यांच्यावर कारवाई न करता मेहरबानी दाखवली जात आहे.तालु्नयात गिरणा आणि तितूर नदीपात्रातून वाळू चोरीचा कहर केला आहे. गेल्या पाच सहा वर्षात तर गिरणा पात्रातून कोट्यावधी रूपयांची वाळू माफियांनी उचलून ती सोन्याच्या भावात विकली आहे. या वाळू चोरीतून महसूल प्रशासनाच्या हातात काहीच पडले नाही. या काळात वाळू चोरीच्या ज्या काही कारवाया झाल्या त्यातून मिळणार्‍या दंडापेक्षा कितीतरी अधिक रकमेची वाळू आतापर्यंत माफियांनी चोरून नेली आहे.
वाळू चोरीचे तांडव ज्या प्रकारे गिरणा पात्रात सुरु आहे तोच प्रकार तितूर नदीच्या बाबतीत आहे. आजमितीस कोट्यवधी रुपयांची वाळू संबधित वाळूचोरांना उपसा केल्याचे घटनास्थळी दिसून येत आहे. असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.हिंगोणे गावाजवळ असलेल्या बांधार्‍या जवळ गेल्या वर्ष भरा पासून ही वाळू माफियांकडून वाळू उपसा सुरू आहे. मात्र वाळू माफियांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ चूप होते.अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ तितूर नदीपात्रातून वाळू चोरीवर पाळत ठेवून होते.अखेर वाळू उपसा करण्यासाठी असणारे जेसीबी मशिन व वाळू वाहतुक करणारे डंपरच भल्या पहाटे गावकर्‍यांनी पकडले व या गावकर्‍यांनी तहसीलदार कैलास देवरे यांना ही माहिती दिली. त्यांचा फोन लागत नव्हता म्हणून ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकार्‍यांच्या दखल नंतर घटनास्थळी तहसीलदार यांच्यासह 6 तलाठी व कर्मचार्‍यांचे पथक दाखल झाले. घटनास्थळावर तहसीलदार यांनी पंचनामा सुरू केला असून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याचे बघून ते सुद्धा अवाक झाले होते.इत्नया मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असतांना देखील गावकर्‍यांनी तक्रार का केली नाही अशी विचारणा त्यांनी केली. गावकर्‍यांनी सदर वाळू माफियावर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे जिल्ह्यात या वर्षाची वाळू चोरी सर्वात मोठी घटना असल्याचे बोलले जाते.याप्रकरणी
वाळू नसल्याने कामे ठप्प
एकीकडे वाळू नसल्याने शासकीय कामे व इतर बांधकाम कामे ठप्प असल्याचे सांगितले जात असतांना दुसरीकडे मात्र गिरणा व तितूर नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी होत आहे.
चोरीची फिर्याद
दरम्यान हिंगोणे येथील घटनेप्रकरणी पंचनामा करण्यात आल्यानंतर विना क्रमांकाचे जेसीबी व एमएच.19 सीवाय.2111हे डंपर जप्त करण्यात आले असून तलाठी प्रविण सुभाष महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर व जेसीबी अज्ञात चालकांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गौण खनिज चोरीप्रकरणी भादंवि कलम 379 प्रमाणे आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेसीबी व डंपरवरील चालक फरार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे.
वाळू चोरीचे चक्रावून टाकणारे गणित
हिंगोणे शिवारात तितूर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होत आहे. आज पहाटे डंपर आणि जेसीबी पकडल्यानंतर गावकर्‍यांनी वाळू काढलेल्या नदीचे मोजमाप केल्याचे सांगितले.यात वर्षभरात 500 मीटर व्यासाचा खड्डा 6 मीटर खोल असल्याचे समोर आले आहे.यात असलेल्या वाळूचा अंदाज लावला तर 15 लाख ्नयूबिक मीटर होतो. एक ्नयूबिक मीटर वाळू 2 हजार रूपये धरली तर 15 लाख गुणिले 2 असा हिशोब 300 कोटीचा होतो.याबाबतचे वाळू चोरीचे गणित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तितूर नदीपात्रातून जर वर्षे दीड वर्षात कोट्यावधी रूपयांची वाळू माफियांनी चोरून नेली असेल तर त्याहून मोठे पात्र असलेल्या गिरणा नदीपात्रातून आतपर्यत किती वाळू चोरीली गेली असेल याचा हिशोबच नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असताना ते संबंधीत यंत्रणेला दिसू नये याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.या वाळू चोरीला राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एवढे मोठे धाडस वाळू माफिया करूच शकत नाही अशी चर्चाही होत आहे. सर्वसामान्यांना वाळू घेण्यासाठी एका ब्राससाठी पाच ते सहा हजार रूपये मोजावे लागतात. याच चोरीच्या कित्येक ब्रास वाळू विक्रीतून किती पैसा येतो याचे गणित उगलडले तर तालु्नयात वाळू चोरीचा व्यवहार हा कैक कोटीच्या घरात जाणारा आहे. त्यामुळे सोन्याहून सोने देणारी नव्हे तर हिरे देणार्‍या या वाळू चोरीच्या माफियांचे राजकीय लागेबंधे नसतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.