डॉ. पाटील यास 14 दिवसांची न्या. कोठडी

0

महिला सरकारी वकील राखी पाटील खून प्रकरण

जळगांव.दि.22-
सरकारी वकील पाटील यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड. राखी पाटील यांचे पती डॉ.भरत पाटील याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी न्या. सचिन हवेलीकर यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयातून त्यांची जळगाव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. या वेळी त्यांनी सांगितले की, संशयित डॉ.पाटील यांनी त्यांची पत्नी राखी यांचा खून कोणत्या कारणासाठी केला याचा तपास करायचा असून दुसरे संशयित लालसींग पाटील यांनाही अटक करावयाची आहे.
घटनेच्या दिवशी डॉ.पाटील व पत्नी राखी यांच्यात झालेल्या झटापटीत राखी यांचा भ्रमणध्वनी नुकसान ग्रस्त झाला असून राखी यांच्या चेहर्‍यावर व हातावर जखमा असल्याचे सांगण्यात आले. डॉ.भरत यांचा पत्नीवर संशय असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र जबाबात डॉ.पाटील हे उलटसुलट माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत आहेत.तसेच दुसरा संशयित लालसिंंग पाटील फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक भुसावळ तालुक्यात गेले होते. लालसिंग पाटील यांचा तपास लागला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.