वारकऱ्यांच्या उपोषणाला अखेर आठव्या दिवशी आले यश !

0

अमरावती (प्रतिनिधी) :   विश्व वारकरी सेना भारत व वारकरी साहित्य परिषद , वारकरी क्रांतीसेना, वारकरी महामंडळ यांच्या पुढाकाराने विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.  गणेश महाराज शेटे यांनी गेल्या 2 डिसेंबर पासून अकोला येथील जिल्हाधिकार्यालया समोर धार्मिक कार्यक्रम  व भजन-कीर्तन करण्यासाठी किमान शंभर भाविकांना कोरोना महामारी च्या संबंधी अटी शर्ती सह परवानगी देण्यात यावी . यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते . या आठ दिवसाच्या उपोषण काळात अकोला जिल्हाधिकारी यांच्यासोबत चार बैठका निष्फळ ठरल्या.

 

मात्र आठव्या दिवशी 9 डिसेंबर रोजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व विरोधी असलेले आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. लांडे महाराज यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन. उपोषण सोडण्यात आले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट करून देऊन मागणी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले. तर आमदार रणधीर सावरकर यांनी येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याचे आश्वासन दिले .

 

या आश्वासनावर विश्वास ठेवून अखेर आठव्या दिवशी उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी जाहीर केले.

 

यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर , माजी मंत्री गुलाबराव गावंडे , जि. प. अध्यक्षा सौ प्रतिभा ताई भोजने , माजी जि.प. अध्यक्षा सौ पुष्पा ताई इंगळे, उपाध्यक्ष राठोड, वासुदेव महाराज खोले, महादेव निम कांडे महाराज , प्रबोधनकार सत्यपाल महाराज , प्रबोधनकार संदीप पाल महाराज, गजानन महाराज दहिकर, गजानन महाराज हिरुळकर, श्रीधर महाराज आवारे, रविंद्र महाराज केंद्रे, तुळशीदास महाराज मसने, शिवा महाराज बावस्कर, वेदांत महाराज मुंदाने, राजू महाराज कोकाटे , विठ्ठल महाराज चौधरी, देविदास महाराज निखारे , विठ्ठल महाराज खापरकर, ज्ञानेश्वर महाराज गाई , गजानन महाराज ऐरोकर , गजानन महाराज गावंडे, योगेश महाराज तांबडे , दिनेश महाराज भामदरे , सोपान महाराज काळुंनसे, शिवहरी महाराज इस्तापे , गोवर्धन महाराज भाकरे , विठ्ठल महाराज महल्ले आदींसह  महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांनी भेटी दिल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.