वादग्रस्त वक्तव्य करणा-या भाजप नेत्यांवर अमित शहा नाराज; कारवाई करणार?

0

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता भाजप नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून भाजपाध्यक्ष अमित शहांनी त्यांना ताकिद बजावली आहे. मागील दोन दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कटील यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असून या वक्तव्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे अमित शहा यांनी ट्विटरवरून म्हंटले आहे. तसेच याप्रकरणी संबंधित नेत्यांना जाब विचारला जाईल, असे शहा यांनी सांगितले आहे.

नथूराम गोडसेंबाबत भाजपा नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा आणि पक्षाचा काही देणं-घेणं नसल्याचं, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय. नथूराम गोडसे यांच्याबद्दल केलेली ती वक्तव्य वैयक्तिक होती… सोबतच तीनही नेत्यांनी आपापली वक्तव्य मागे घेत माफीनामा सादर केल्याचंही अमित शहा यांनी म्हटलंय. या तीनही नेत्यांकडून पक्ष जबाब मागणार आहे आणि १० दिवसांच्या आत पक्षाला आपला अहवाल सादर करेल, असंही अमित शहा यांनी म्हटलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.