दुसऱ्याचे भांडण सोडवण्यासाठी गेला अन स्वतःच्या हात फॅक्चर करून घेतला

0

एरंडोल :- तालुक्यातील नागदुली येथे अब्दुल बाबू खाटीक वय 55 वर्षे हे नमाज पडण्यासाठी मशिदीमध्ये गेले असता तेथे युनुस मनवर मुसलमान व वसीम अब्दुल मुसलमान रा. नागदुली ता एरंडोल यांचे व शाहरुख मोहम्मद खाटीक , फैजल भिकन खाटीक यांचे भांडण सुरू होते हे सोडवण्यासाठी  गेले असता फिर्यादी यांना मारहाण झाल्याची घटना नागदुली येथे घडली.

रमजान महिना सुरू असल्याने रात्री 9-30 वाजता बहुतेक सर्व मुस्लिम मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी जातात. मशिदीमध्ये कुलर लावलेले होते क्या कुलर च्या समोर शाहरुख खाटीक व फैजल खाटीक हे उभे होते त्यांच्याशी युनुस मुसलमान व वसीम मुसलमान यांचा वाद सुरू झाला यांच्या हा वाद मिटवण्यासाठी अब्दुल बाबु खाटीक समजावण्यासाठी गेले असता या गोष्टीचा राग येऊन त्यांना युनुस मनवर मुसलमान व वसीम अब्दुल मुसलमान यांनी लाथा बुक्क्यांनी चापटांनी मारहाण करून शिवीगाळ करत तुला पाहून घेऊ असा दम देऊन मशिदीच्या पायरीवरून ढकलून दिले असता अब्दुल खाटीक यांच्या हात फॅक्चर झाला.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भादवि कलम 325,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल भीमराव मोरे, उमेश पाटील हे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.