वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान

0

भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील टायगर ग्रुप चे कार्यकर्ते मनोज ह्यालिंगे यांनी आपला वाढदिसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न करता ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथिल नागरिकांना अन्नदान करत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व उत्तर महाराष्ट्रातील सागर कांबळे तसेच खान्देश अध्यक्ष ऋषिकेश  भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप पिंपरखेडचे कार्यकर्ते मनोज ह्यालिंगे यांचा वाढदिवसानिमित्त भडगाव येथील शांती नगर या झोपडपट्टी वस्तीत गरीब व गरजू बांधवांना तसेच पाचोरा, भडगाव शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांना जेवण देण्यात आले. सदरील कार्यक्रमास टायगर ग्रुप पिंपरखेड ता.भड़गाव जि.जळगाव व टायगर ग्रुप पाचोरा दिपक शिरसाठ* उपस्थित होते.

वाढदिवसाच्या दिवशी अन्नदान केल्याने सर्वच कोरोना रुग्णांचा या आमच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा करून टायगर ग्रुप चे कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.