वरणगावला महिलेची आत्महत्या

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील बढे वाड्यातील रहिवाशी असलेल्या महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली.

या बाबत वृत असे की बढे वाडयातील रहिवाशी असलेल्या वत्सलाबाई विष्णु बढे ( ५५ ) या महिलेने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीतील छताच्या हुकाला नायलोनच्या दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली हि घटना सोमवारच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही. या बाबत सुनिल लक्ष्मण बढे याच्या खबरीवरूण वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास फौजदार सुनिल वाणी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.