वरणगावला कोरोना रुग्ण शोध मोहिमेत १३० स्वॉब तपासणीसाठी रवाना, तर एका बालकास कोरोनाची लागन

0

वरणगाव (प्रतिनीधी) : शहरातील ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोरोना रूग्ण शोध पंधरवाडा अर्तगत तीसऱ्या टप्यात १३० स्वॉब तपासणी साठी रवाना करण्यात आले, तर शहरातीत चार वर्षाच्या बालकास कोरोनाची लागन झाली.

नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने कोरोना रूग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येत असुन तीसऱ्या टप्यात मंहात्मा गांधी विद्यालयात शहरास परिसरातील असे एकून १३० स्वॉब घेण्यात येऊन तपासणी साठी रवाना करण्यात आले असल्याची माहीती डॉ नितिन सोनवणे यांनी देत रामपेठ भागातील चार वर्षाचा बालकाचा स्वॉब अहवाल पॉझीटीव आला असल्याने सागीतले आहे. स्वॉब घेण्यासाठी शहरातील खासगी डॉ नितिन बढे, डॉ सुनिल अहिराव, डॉ रविंद्र माळी, डॉ सिमा सोनवणे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कर्मचाऱ्यानी मदत केली

Leave A Reply

Your email address will not be published.