वरणगावला कापड दुकानाला आग आठ लाखाचे नुकसान

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहराच्या मुख्य रस्त्यावरील सुरेश ड्रेसेस कापड दुकानाला इलेक्ट्रीक शॉट सर्कीटमुळे  लागलेल्या आगीत दुकानातील सर्वचे सर्व माल जळून खाक होऊन सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे.

शहरातील मुख्य मार्गावरील मोरेश्वर सुकदेव सरोदे यांच्या मालकीचे सुरेश ड्रेसेस हे कापड दुकान चैन द ब्रेक मुळे सर्वच दुकाने बंद असताना दि ८ शनिवार रोजीच्या दुपारच्या वेळेस इलेक्ट्रीक शॉक सर्कीट मुळे आचनाक आग लागली. त्यात दुकानातील सर्वच्या सर्व कपडे जळून खाक झाल्याने सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असून या बाबत घटनेचा तलाठी कल्पना शिंपी यांनी पंचनामा केला आहे

दुपारी अचानक पणे दुकानाच्या शटर मधुन धुर निघत असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्याच्या लक्षात आल्याने  व घटनेची माहीती मिळताच  वरणगाव पोलीस स्टेशन सह पोलीस निरिक्षक  सुनिल वाणी , मजहर पठाण नगर परिषद कर्मचारी दिपक भंगाळे  यांनी धाव घेऊन तत्काळ त्यांनी दुकान मालकास बोलवुन आग विझविण्याचा प्रयत्न केला तोवर मात्र दुकानातील सर्वच्या सर्व कपडे जळून खाक झाले होते.

अग्नी बंबाची मागणी 

सुमारे पंनास हजार लोक संख्या असलेल्या शहर व त्याचा वाढता विस्तार पाहता नगर परिषदेकडे किमान एक तरी अग्नी बंबाची गाडी असणे गरजेचे आहे. मात्र परिषदेने अग्नी शमन दलासाठी भव्य इमारत उभी केली खरी. मात्र, त्या आधी किमान एक तरी अग्नी बंबाची गाडी असती तर कदाचित ही किंवा शहरात होणाऱ्या आगीच्या घटना टाळू शकतील अशी भावना यावेळी नागरिकानी व्यक्त करीत अग्नी बंबाच्या गाडीची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.