लसीकरण केंद्रांवर गोंधळ घालणाऱ्यांवर कार्यवाही करावी ; सामान्य नागरिकांची मागणी

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर शहर व तालुक्यात लसीकरणाला आता मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.शासनाने केलेल्या आवाहनामुळे नागरिकांचा देखिल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.अमळनेर शहरातील २ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.

मागील काही काळापासून कोविड काळात आरोग्य कर्मचारी,पोलीस व प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन परिस्थिती हाताळत आहे.कोविड सोबतच आता लसीकरणाच्या कामात आरोग्य यंत्रणा काम करत आहे.

मात्र, काही नागरिकांकडून सर्व सुरळीत चालू असतांना लसीकरण केंद्रांवर गोंधळ निर्माण करण्यात येत आहे.यामुळे सरकारी कामात अडथळा येऊन मध्येच लसीकरण थांबते किंवा उशिराने सुरू होते.यामुळे मात्र सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला ताप ठरणाऱ्या अशा लोकांवर कार्यवाहीची मागणी आता होत आहे.

 

 

 

 

लसीकरण केंद्रांवर गोंधळ करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.आरोग्य यंत्रणा त्यांचे काम योग्य पद्धतीने करत असून,लसीकरण सुरळीत सुरू आहे.

 

सीमा अहिरे

(प्रांताधिकारी,अमळनेर)

Leave A Reply

Your email address will not be published.