वरणगांव आयुध निर्माणीमध्ये ३५ दारूच्या बाटल्या जप्त –सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरणगांव आयुध निर्माणीचे वर्क्स कमिटीचे मतदान सुरू असतांना फॅक्टरी मध्ये दररोज रात्री युनियनचे पदाधिकारी गेट मधुन बिनधास्त पणे दारू आतमध्ये घेऊन जात असून “युनियनवाल्यांचा जंगल मे मंगल राज “ करीत असून ओली पार्टी सुरू असल्याचे खात्रीदायक माहिती तसेच गोपनीय तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी दिली होती.या तक्रारीची दखल नूतन महाप्रबंधक सुशांत कुमार राऊत यांनी तत्काळ घेऊन गेट मधून आत येणाऱ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.या अनुषंगाने शुक्रवार रोजी रात्री जवानांनी एका उमेदवार व त्याच्या सहकाऱ्याकडून दारूच्या ३५ बाटल्या जप्त केल्या  असून मतदान करून घेण्याचा मानस उधळून लावला आहे.

सविस्तर वृत्त असे की,वरणगाव फॅक्टरी मध्ये कार्य समितीची निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन देण्यासाठी ओल्या पार्टी सुरू असल्याचे माहिती सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनी दिल्यावरून  फॅक्टरीमध्ये कर्मचाऱ्यांच्या झडत्या घेतले असता दिनांक १८/१२/२०२० शुक्रवारी रोजी रात्री ३५ दारूच्या बाटल्या जप्त केल्याचे वृत्त केल्याचे वृत्त आहे.खन्ना यांनी यापूर्वीच महाप्रबंधक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबंधी माहिती दिली होती तरीसुद्धा कारवाई होत नसल्याने शुक्रवार रोजी रात्री जवानांनी एका उमेदवारास व त्याच्या सहकार्यास दारूच्या बाटल्या घेऊन मतदान करून घेण्याचा मानस उधळून लावला आहे.या कारणाने फॅक्टरीमध्ये चर्चा रंगली आहे.वरणगांव आयुध निर्माणीमध्ये दारू जप्त करण्यात आल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात वाऱ्याप्रमाणे पसरली असून जवानांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांचा गौरव करण्यात यावा असे खन्ना यांनी सांगितले.हे प्रकरण वरणगांव पोलीस स्टेशनला वर्ग करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.