वढवे शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

0

मुक्ताईनगर  (वार्ताहर) : तालुक्यातील वढवे शिवारात बोहर्डी रस्त्या लगत आज सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान अनोळखी सुमारे 40 ते पन्नास वर्षे वयाच्या इसमाचे प्रेत  आढळले. सदर इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यामुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याच्या अंगावर पांढरा प्लेन फुल शर्ट व निळ्या रंगाची अंडरवियर घातलेली असून उंची पाच फूट पाच इंच इतके आहे. अंदाजे  दहा ते 12 दिवसांपूर्वी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप ओळख पटलेली नाही. यासंदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील वाढवे येथील पोलीस पाटील किरण बोठे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक खंडारे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.