लोहारा येथे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र नसल्याने ग्राहक बुचकाळ्यात

0

-ग्राहकांची गैरसोय;थकबाकी वाढल्यास जबाबदार कोण?
-अधिकृत भरणा केंद्र घोषित करण्याची मागणी
लोहारा ता.पाचोरा-प्रतिनिधी
पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत विज बिल भरणा केला जायचा तद्नंतर आपले सरकार सेवा केंद्र यांमार्फत विज बिल स्वीकारले जायचे पण तेच बंद पडल्याने ग्राहकांची सेसेहपालट सुरु झाली आहे
येथे अधिकृत विज बिल भरणा केंद्र नसल्याने काहीजण आपले खाजगी अधिकार व खात्याचा अधिकार वापरत विज बिल भरणा करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते याबदल्यात ग्राहकांकडून दहा रुपये जास्तीचे घेतले जाते तर यातील अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोनच जण भरणा करून घेऊ शकतात लोहारा गावी जवळपास १८०० कनेक्शन धारक असतानाही महावितरणने ही समस्या निर्माण होण्याअगोदर सोय केलेली नसल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय विज कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये म्हणून बरेच ग्राहक स्वयंस्फूर्तीने वेळेतच भरणा करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच देणारा तयार आहे पण घ्यायला कुणी नाही!असा प्रकार येथे दिसून येतोय नियमित भरणा करणारे ग्राहक अधिक बुचकळ्यात पडलेे आहेत या महिन्यात यांच्याकडे तर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्याकडेच असा नियमित बदलता प्रकार घडतोय असंतोषाने काही सुज्ञ ग्राहकांनी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजपूत यांकडे कैफियत मांडली असता त्यांनी सदर विभागाकडे याबाबत विचारणा केली तर पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कर्मचारी बसविला जाईल व त्याकडून ग्राहकाचे वीज बिल भरणा करून घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे तर एका पतसंस्थेकडून प्रस्तावही मागण्यात आला आहे असे सांगण्यात आले ही संस्था मात्र फारशा प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे कळते यामुळे ग्राहक अजून किती महिने वेठीस धरले जाणार?त्यांची आर्थिक पिळवणूक किती महिने होणार? थकबाकी वाढुन भारनियमन सुरू झाल्यास त्याला ग्राहक जबाबदार धरले जाणार आहे काय? खाजगी अधिकाराचा वापर करून विज बिल भरणा करून घेणाऱ्यांवर कारवाई होणार काय? असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण केले जाऊन माध्यमांच्या रूपातून महावितरण कडून अधिकृत विज बिल केंद्र घोषित करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.