लोणी येथे दफनविधी करू देण्यास शेतकऱ्याचा मज्जाव !

0

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दफनविधी शांततेत संपन्न

पारोळा(प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आज एका शेतकऱ्याने आपल्या शेतात दफनविधी करू नये यासाठी विरोध केला होता मयताच्या नातेवाईकांनी  व समाजबांधवांनी पारोळा पोलीस स्टेशनला धाव घेतली व पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मध्यस्थीने वाद मिटला व दफनविधी त्याच  ठिकाणी शांततेत पार पाडला.

पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सत्यभामाभाई दशरथ भिल वय 70  यांचे काल दि 5 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते आज 11 वाजता अंत्ययात्रा होती, गावातील एका शेतकऱ्याच्या शेताच्या अगदी बांधाजवळ हा दफनविधी होणार होता या ठिकाणी वर्षानुवर्षांपासून भिल्ल समाजाचा दफनविधी होत होता परंतु शेतात पीक असल्याने  व अन्य कारणांमुळे या शेतकऱ्याने शेतात किंवा शेताजवळ दफनविधी करू नये असे सांगितले मग आम्ही दफनविधी करायचा तरी कुठे याबात शेतकरी व भिल समाज बांधवांम्हद्ये शाब्दिक वाद झाला त्यानंतर मयताच्या नातरवाईकांनी व गावातील समाज बांधव पारोळा पोलीस स्थेशनला आले त्यात माणिक उखा भिल,  हेमराज शालीक भिल, रामाबाई भाईदास भिल, जनाबाई भाईदास भिल, दशरथ भिल, जयराम भिल, हनुमान भिल, संदीप अहिरे,पोलीस पाटील राजू पाटील  आदि पुरुष महिला समाज बांधव यांनी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्याकडे कैफियत मांडली शेतकरी व मयतांच्या नातेवाईकांशी सुसंवाद करून एवढ्या वेळेस दफनविधी करू द्या मयताची अवहेलना होऊ देऊ नको यापुढील दफनविधी च्या आधी दोघांना एकत्र बसवून त्यातून तोडगा काडू असे सांगत आपसातील वाद मिटवला व पुढील दफनविधी सुरळीत सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.