लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – प्रांताधिकारी सुलाने

0

भुसावळ प्रतिनिधी

सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या 12 भुसावळ (अ.जा.) मतदार संघामधील बीएलओ, सुपरवायझर्स, तलाठी, ग्रामसेवक, क्षेत्रिय अधिकारी, कृषी सहाययक यांची बैठक 9 रोजी सकाळी 11 वा लोणारी समाज मंडळ, भुसावळ येथे आयोजीत करण्यात आली होती.
या सभेस रुपककुमार मुजुमदार, निरिक्षक व रामसिंग सुलाणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 12 भुसावळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ यांनी मार्गदर्शन केले. प्रथम रुपककुमार मुजुमदार, निरिक्षक यांचे स्वागत रामसिंग सुलाणे यांनी पुष्पगुच्छ देवुन केले. रामसिंग सुलाणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 12 भुसावळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ यांनी प्रस्ताविक केले त्यात त्यांनी सांगितले की आपण सर्वानी निवडणूकीच्या कामात स्वताला झोकुन दिले आहे. आपण निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करीत आहोत. आपली जबाबदारी काय व आपण कसे काम केले पाहीजे. या बददल उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे काम पारदर्शक पणे व निपक्षपातीपणे पार पाडणे महत्वाचेआहे. असे सांगितले तसेच त्यांनी सांगितले की, वृध्द, अपंग, गर्भवती महिला, स्तनदामाता, इ. साठी आवश्यकता असल्यास मतदानाला येणे साठी
वाहने पुरविली जातील, सी व्हीजेल अ‍ॅप तयार केले असून कुठेही गैर प्रकार आढळल्यास त्याचे शुटिंग करुन आपण तक्रार नोंदवू शकतात असेही सांगितले. तसेच नमुना 12 मध्ये कर्मचार्‍यानी आपले मतदान नोंदवावे असेही त्यांनी आवाहन केले आहे, तसेच रुपककुमार मुजुमदार यांचा मोबाईल क्रमांक 9423701478 असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.