लॉकडाऊन चित्रकला स्पर्धा – 2020 बक्षीस वितरण

0

न्हावी, ता.यावल (वार्ताहर)- कलाविष्कार गृप फैजपूरतर्फे यावल तालूका स्तरीय “लॉकडाउन चित्रकला स्पर्धा-२०२०चे बक्षीस वितरण कार्यक्रम जेष्ठ नागरिक मंडळ सभागृहात सतपंथरत्न प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

लॉकडाउन काळात गणेश उत्सवा निमित्ताने गणपतीचे चित्र किंवा गणेश उत्सवातील प्रसंग या विषयावर कलाविष्कार गृप फैजपूर तर्फे लॉकडाउन चित्रकला स्पर्धा -२०२० विविध पाच गटात घेण्यात आली.या स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ नागरिक सभागृहात शासनाच्या आदेशानुसार पालन करून करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे  डॉ.अजित थोरबोले प्रांताधिकारी, प्रकाश वानखेडे ए पी आय फैजपूर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिक मंडळ फैजपूरचे अध्यक्ष  विलास महाजन ,सचिव  रमेश चौधरी गुरूजी, परीक्षक  अविनाश नेमाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य  जनार्दन हरीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाविष्कार गृपचे सचिव व्ही ओ चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या स्पर्धेत बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, ट्राफी व प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या सत्कारानंतर त्यांच्या हस्ते देण्यात आले.

गट-१(इ.१ली व २री) प्रथम- विरेश प्रविण जैन विद्या विकास इंग्लिश मेडिअम स्कूल ,साकळी,व्दितीय-प्राप्ती मोहन बडगुजर जि प मराठी मुलींची शाळा,साकळी,तृतीय-रूद्राक्ष राहूल चौधरी जे टी महाजन सेमी इंग्लिश मेडिअम स्कूल फैजपूर

गट-२(इ.३री व ४थी) प्रथम-रिया विकास चौधरी शि प्र मंडळाची खाजगी प्राथमिक शाळा न्हावी, व्दितीय-साची प्रविण जैन विद्या विकास इंग्लिश मेडिअम स्कूल साकळी,तृतीय-चिन्मय योगेश इंगळे शि प्र मंडळाची प्राथमिक शाळा न्हावी

गट-३(इ.५वी व६वी) प्रथम-श्रवण जनार्दन साळुंके इंग्लिश मेडिअम पब्लिक स्कूल डोणगाव, व्दितीय-चित्रा अशोक चौधरी जे टी महाजन सेमी इंग्लिश मेडिअम स्कूल फैजपूर, तृतीय-वैभवी चंद्रकांत नेवे शारदा विद्या मंदिर साकळी

गट-४(इ.७वी व ८वी) प्रथम-पुर्वा राजेश महाजन जे टी महाजन इंग्लिश मेडिअम स्कूल फैजपूर, व्दितीय-विशाखा कमलाकर चौधरी भारत विद्यालय न्हावी, तृतीय-दर्शन योगेश निंबाळे भारत विद्यालय न्हावी

गट-५(इ.९वी व १०वी) प्रथम- निनाद विपीन ढाके कुसूमताई माध्यमिक विद्यालय फैजपूर, व्दितीय-़पार्थ विकास चौधरी भारत विद्यालय न्हावी तृतीय-(विभागून)जयेश चौधरी, भूवनेश्वरी किशोर ब-हाटे भारत विद्यालय न्हावी.

तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

प्रसंगी कार्यक्रमात रावेर तालूका माध्यमिक शिक्षक गौरव समिती तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनी अर्जुन जयराम सोळुंके कलाशिक्षक श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे ता रावेर यांची “आदर्श शिक्षक” पुरस्कार-२०२० साठी निवड झाल्याबद्दल अजित थोरबोले प्रांताधिकारी यांचे हस्ते कलाविष्कार गृप तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख बक्षीस दाते  बी डी चौधरी समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन फैजपूर, योगेश जैन -जैन अॕग्रो एजन्सी फैजपूर, एन एन अजलसोंडे सर, पी व्ही पाटील, जी जी इंगळे, डी पी बोरोले, जा.का.कोल्हे ,आर.जे.पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.चित्र संकलनासाठी वैष्णवी जनरल स्टोअर्स चे सुनिल वारके यांचे ही सहकार्य लाभले

प्रसंगी कलाविष्कार गृप चे अध्यक्ष युवराज लोधी, सचिव व्ही ओ चौधरी, नलिनी कोल्हे अश्विनी कोळी, मनिषा चौधरी, अविनाश नेमाडे,चंदन भालेराव,राजेंद्र जावळे,संकल्प लोधी,पुष्पक पाटील,प्रशांत किरंगे,जितेंद्र कापडे,चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन सोळुंके यांनी व आभार युवराज लोधी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.