धक्कादायक ! कोविड रुग्णालयात पहूरच्या रुग्णाने घेतला गळफास

0

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोविड रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पहूरच्या रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कडुबा नकुल घोंगडे (५०, रा. पहूर, ता. जामनेर) मृत रुग्णांचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली असून दोन तास म्रुतदेह लटकलेला होता, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयात स्टाफ होता की नाही हा देखील मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.