लॉकडाऊनमुळे गैरसोय होत असलेल्या रुग्णांसाठी धावून आले आ. मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनीधी) : तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले चाळीसगाव शहर वैद्यकीय सोयी सुविधा यासाठी मेडिकल हब म्हणून आपली ओळख बनवत आहे. चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुका तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील रुग्ण विविध उपचारासाठी चाळीसगाव शहरात येत असतात मात्र लॉकडाऊनमुळे मागील २ महिन्यांपासून हॉटेल व चहाच्या टपऱ्या बंद असल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना चहा – नाश्त्याची सोय होत नव्हती. बहुतांश रुग्णांना सकाळी चहा सोबत औषधी दिली जाते मात्र हॉटेल बंद असल्याने नाईलाजाने उपाशीपोटी रुग्णांना औषधी घ्यावी लागत होती. ही बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन च्या मार्फत एडमीट असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना दररोज सकाळी चहा व पारले जी बिस्कीट पुडा देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी डेअरी एरियातील विकास टी हाऊस चे संचालक विकास सपकाळ व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी मुन्ना उर्फ कुणाल तांबे यांना या सेवाकार्याची जबाबदारी देण्यात आली.

मागील १५ दिवसांपासून दररोज शहरातील ७ ते ८ हॉस्पिटलमध्ये १४० ते १५० रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना न चुकता चहा व सोबत एक पारले जी बिस्कीट पुडा देखील दिला जातो.
भल्या पहाटे सकाळी ७ वाजता चहा – बिस्कीट वाटपास सुरुवात होते ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहते. खऱ्या अर्थाने जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेत आमदार मंगेश चव्हाण हे लॉकडाऊन च्या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी धावून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.