लॉकडाऊनमुळे एरंडोल बस आगाराला चार दिवसांत विस लाखांचा फटका

0

 एरंडोल (प्रतिनिधी) : लॉकडाऊन मुळे गेल्या चार दिवसांत एरंडोल बस आगाराचे सुमारे विस लाख रूपयांचे नुकसान झाले आहे अशी माहीती आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांनी दिली आहे.

कोरोना चा वाढता उद्रेक व सुरू असलेला लॉकडाऊन या कारणांमुळे प्रवासी बाहेर पडत नाहीत म्हणून एरंडोल बस आगारातर्फे अत्यावश्यक सेवेतील प्रवाश्यांसाठी जळगाव,भडगाव व धरणगाव साठी तीन ते चार गाड्या चालू आहेत. एरवी या आगारातर्फे राबविण्यात येणारी चोपन्न नियते प्रवाश्यांअभावी बंद करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या सहा फेर्यांमुळे डिझेलचा खर्च सुध्दा निघत नाही ही वस्तूस्थिती आहे. या आगाराचे रोजचे उत्पन्न सुमारे साडेचार ते पाच लाख रूपये आहे.

लॉकडाऊन काळामुळे हे उत्पन्न बुडत आहे. आगारात एकूण ३२० कर्मचारी आहेत.लॉकडाऊन मुळे आगारातील सर्व बसगाड्या ‘होम क्वारंटाईन, झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.