लॉकडाउनच्या सलग तिसऱ्या दिवशी १५७ केसेस सह ६४ हजार ३००रुपये दंड वसुल

0

अमळनेर (प्रतिनिधी):-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज तिसऱ्या दिवशी देखील अमळनेर शहरात विनाकारण तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही वाहनचालकांन व्यतिरिक्त लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन झाले. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी व दुकानदारांनी स्वयंशिस्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती.

जळगांव जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या लाँकडाऊनला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी अमळनेर शहरातील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या टीम ने चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही नागरिक लाँकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे त्यांचे निर्दशनास आल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.
आज लॉक डाऊन च्या तिसऱ्या दिवशी सुद्धा शहरात फिरणारे १५७ नागरिकांकडून ६४ हजार ३०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. यात विनापरवाना बिना मास्क म्हणून कारवाई करण्यात आली.

सदरच्या कारवाई पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह संजय पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली.
अमळनेर शहरातील नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे,कायद्याचे उल्लंघन करू नये नाहीतर यापुढेही कडक कारवाई केली जाईल असे अमळनेर शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.