लॉकडाउनचे नियम न मोडता वीस वर्षानंतर भरला नियोजित हायटेक मेळावा

0
शेंदूर्णी,-
        ‘यारा तेरी यारी को …
         हमने तो खुदा माना .. ‘
या गीताची आठवण व्हावी अन् साऱ्या मित्रांना  भेटून आनंद व्हावा असा प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात  साकारल्या गेला . तब्बल वीस वर्षांनंतर जामनेर महाविद्यालयातील पदवीधर  सन-1998ते2001 कॉमर्सच्या बॅचचा मित्र मेळा ऑनलाईन रंगला .
    प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील शाळा कॉलेज पूर्ण करून शिक्षणाचे दिवस संपले की आपआपल्या करिअरसाठी विविध क्षेत्राकडे धाव घेतो . मात्र शाळा, कॉलजचे दिवस संपले कि ज्या शाळा कॉलेजमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झाले, तेथे वेगवेगळया भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडतो, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते.
प्रत्येकजण आपल्या नोकरी व्यवसायात असल्याने ते शक्य नसते . व अशक्य ही नसते . हे आज आधुनीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवून दिले .
    पदवीधर कॉमर्स सन1998 ते 2001 या वर्षातील विद्यार्थ्यांचा सोशल मिडीया अॅप (व्हाटस अॅप ) वर ग्रुप होता . सहा महिन्या अगोदर या माध्यमातून सर्वांनी वेळ काढून ‘ ‘गेट टू गदर ‘ करण्याचे ठरवीले .व सर्वांच्या सोईनुसार दिनांक ठरविली . मात्र कोराना विषाणूचा थैमान वाढल्याने शासनाने उपायात्मक म्हणून लॉक डाऊन जाहिर केला . व मैत्रीच्या स्नेहसंमेलनावर कोरानाचे सावट आले . मात्र सर्व मित्र मैत्रिणींनी यावर मात करण्याचे ठरवीले.  डिजीटल तंत्रज्ञानाच्या साह्याने हे शक्य झाले .नियोजित तारखेस झूम अॅपच्या साह्याने सर्व मित्र मैत्रिणी वीस वर्षानी एकत्र आले .या कालखंडात काही प्रिय अप्रिय घटना घडल्या काही मित्रांना काळाने हिरवून घेतले . त्यांची आठवण आल्याशिवाय राहीली नाही .एकत्र ऑनलाईन येवून सर्वांनी मनमुराद संवाद साधला . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भेटीचा आनंद खूप होता . शाळा कॉलेज जीवनातील विविध गमतीदार किस्से आठवून सर्व खळखळून हसले . प्रत्येकाने आपल्या नोकरी व्यवसाय परीवार प्रगतीची माहिती दिली .व भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. बऱ्याच मित्रांना तांत्रिक अडचणीमुळे सहभागी होता आले नाही .
        महाविद्यालयातून विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होऊन बाहेर पडले. यातील बहुतांश  विद्यार्थी मोठे उद्योजक, व्यापारी आहेत , काही बडे राजकारणी किंगमेकर , शिक्षक , प्राध्यापक , यशस्वी शेतकरी , समाजसेवक , पत्रकार ,नोकरदार आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका , समाजसेविका त्याच प्रमाणे आदर्श  गृहिणी आहेत.
     शासनाने कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉक डाऊन जाहिर केले . तरी जुन्या मित्रांनी सोशल मिडीया अॅपचा   वापर करून कुठलाही नियम न मोडता, शासकिय यंत्रणांना त्रास न देता, गर्दी न करता स्नेहाचा सुंसवाद साधला . व गेट टू गेदर यशस्वी केले  याची इतर सर्व मित्र मैत्रिणीमध्ये चर्चा होवून प्रशंसा होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.