लेफ्टनंट राहुल पाटील यांचे किनगावात स्वागत

0

यावल ( प्रतिनीधी) किनगाव येथील अरूण मुरलीधर पाटील(अरूण टेलर) यांचे सुपुत्र राहुल अरूण पाटील यांची इंन्फट्री गोरखा रेजिमेंटसाठी लेफ्टनंट अधीकारी म्हणून नियुक्ती झाली असुन दि.२१ नोव्हेंबर रोजी दिक्षांत समारोह पुर्ण करून त्यांना लेफ्टनंट या पदाची पदक  समारंभात प्रदान करण्यात आली.

 

त्यानंतर दि.२५ रोजी राहुल पाटील हे सुटी घेऊन आपल्या जंन्म भुमीत म्हणजेच किनगाव येथे आले असता किनगावकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले तर महीलांनीही राहुल पाटील यांचे औष्णीक पुजन केले राहुल पाटील हे किनगावला आल्या पासून त्यांच्या निवास्थानी सर्वस्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

तर डांभुर्णी येथील स्वयंदिप प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा व दिपस्तंभ जळगावचे सदस्य संदिप निंबाजी पाटील यांनीही राहुल पाटील यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संदिप पाटील सर यांनी आठवणींना उजाळा देत राहुल पाटील हे दिपस्तंभच्या एस.पी.आय.च्या २०१३ बँचचे माझे विद्यार्थी होते त्यांच्या लेखी परीक्षा तसेच मुलाखात(Mock Interview)या अंतीम निवडीच्या टप्यात मला राहुल पाटील यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली व आज ते लेफ्टनंट झाले याचा मला अभिमान आहे असे म्हणत संदिप पाटील सर यांनी राहुल पाटील आणी परीवाराचे अभिनंदन केले.

 

यावेळी त्यांच्या सोबत किनगावचे सामाजीक कार्यकर्ते विजय पाटील व बाँक्सींग पटू दिशा पाटील हे उपस्थीत होते. राहुल पाटील यांचे वडील अरूण मुरलीधर पाटील हे टेलरींगचा व्यवसाय करतात तर आई सौ.रंजना अरूण पाटील या गृहिणी आहेत तर राहुल पाटील आणी मयुर पाटील हे त्यांचे दोन सुपुत्र असुन राहुल पाटील लेफ्टनंट झाले आहेत तर मयुर पाटील हे पुण्यात शिक्षण घेत आहेत तर आपला पुत्र देशाची सेवा करूण आजोबा कै.माजी सैनिक मुरलीधर नंथ्थु पाटील यांचा वारसा पुढे नेत असल्याचा अभिमान अरूण पाटील व त्यांच्या अर्धांगीणीला आहे व या दाम्पत्यांने असे सुपत्र घडवुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे म्हणूनच लेफ्टनंट राहुल पाटील यांच्यासह त्यांच्या आई व वडीलांचाही सत्कार सर्व क्षेत्रातुन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.