लपूनछपून व्यवसाय करणाऱ्या १८ दुकानदारांवर जळगाव मनपाची कारवाई

0

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोना कोरोना नियमांचे उल्लघन करून व्यवसाय करणाऱ्या १८ दुकानांना सील करण्याची कारवाई आज मनपाच्या  पथकाद्वारे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबतचे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश आहेत.  मात्र, नागरिक कोरोना संसर्ग वाढत असतांना नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहेत. यात काही दुकानदार ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच प्रकारे दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करणारे जवळपास १८ दुकानांना सील करण्यात आलेत.

बळीराम पेठेतील पुष्पा कलेक्शनमध्ये महिलांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचा प्रकार मनपा पथकासमोर उघड झाला.  आज नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स, राजस्थान वेल्डिंग वर्क्स (कोंबडी बाजार चौक),  न्यू बी. जे. मार्केटमधील श्री राज आटो, सॅनोरीटा  इलेक्ट्रिकल्स, महाराष्ट्र पेंट हाऊस, वेद प्रिंट्स ऑफसेट, शाह इंजिनीअरिंग वर्क्स, सुनील अर्जुन पाटील हे दुकाने सील करण्यात आली. बोहरा गल्लीत अनंत हेअर आर्ट्स, आकाश शूज सेंटर (दौलत प्लाझा, टावर चौक),  पुष्पा कलेक्शन (बळीराम पेठ), महात्मा फुले मार्केट मधील जगदीश होजीअरी, मेट्रो ड्रेसेस, राधिका ड्रेसेस, विशाल युनिफॉर्म व शाहू नगर हौसिंग सोसायटी मधील दीपक प्लाय अॅन्ड  किचन व निसरा प्रहार प्रेसला सील लावण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.