लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच लावा – दिलीप पाटील यांचे आवाहन

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉक डाउन ‌केले असून काही निर्बंध व नियम लागू केलेले असतांना काही लोक शासनाच्या नियमांची पायमल्ली करतांना आढळून येतात जसे लग्नात फक्त आणि फक्त ३५ ते४० लोक व्यतिरीक्त लोक नसावेत लग्न लावताना नवरदेव नवरी व वऱ्हाड मंडळींनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक सांगितले आहे.

तसेच स्वयंपाक देखील मोजक्याच लोकांचा बनण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्वांसाठी नाही तर परंतु खेडेगावात कोण पहातो म्हणून काही लोक शासनाच्या आदेशानुसार न वागता आजही पैशांचे प्रदर्शन दाखवतांना दिसतात तसेच कोरोनाची लागण झालेल्या गावातील पाहुणे मंडळीला फोन करून बोलावतात त्यामुळे लग्नात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत आहे. हि वस्तूस्थिती नाकारता येत नाही याबाबत पोलिस प्रशासनाने आपली करडी नजर ठेवून नियम मोडून लग्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी दिलीप प्रकाश पाटील यांनी केली आहे तसेच ज्या गावात कोरोनाची लागण झाली आहे अशा गावातील व्यक्तींनी लग्नाच्या ठिकाणी येवू नये असे आवाहनही शेती निष्ठ शेतकरी दिलीप प्रकाश पाटील यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.